ब्रेकिंग न्यूज
क्रीडा

शताब्दी चषक' क्रिकेट स्पर्धेतून उद्याचे मुंबई आणि भारतासाठी खेळणारे क्रिकेटर तयार होतील - एमसीए सह सचिव दीपक पाटील

१६ ऑक्टोबर, २०२५ रोजी ०५:४४ PM2 मिनिटेप्रतिनिधी -: नम्रता सूर्यवंशी
शताब्दी चषक' क्रिकेट स्पर्धेतून उद्याचे मुंबई आणि भारतासाठी खेळणारे क्रिकेटर तयार होतील - एमसीए सह सचिव दीपक पाटील
शेअर करा:

‘शताब्दी चषक' क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे जिह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक मोठे व्यासपिठ उपलब्ध करुन दिले आहे. खेळाडूंनी चांगली कामगिरी करुन संधीचे सोने करावे.

‘शताब्दी चषक' क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ठाणे जिह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक मोठे व्यासपिठ उपलब्ध करुन दिले आहे. खेळाडूंनी चांगली कामगिरी करुन संधीचे सोने करावे. याच स्पर्धेतून उद्याचे मुंबई आणि भारतासाठी खेळणारे क्रिकेटर तयार होतील, असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव दीपक पाटील यांनी व्यक्त केला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने स्पोर्टिंग क्लब कमिटीतर्फे १४ वर्षाखालील तिसऱ्या शताब्दी चषक दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ गुरुवारी सकाळी सेंट्रल मैदान येथे संपन्न झाला. त्यावेळी दीपक पाटील प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.

यावेळी मुंबई रणजी पट्टू मोहित अवस्थी, एमसीए सदस्य सुरेंद्र हरमळकर, सिलेक्टर सुनिल राऊत, अरविंद कदम, उन्मेष खानविलकर, विघ्नेश कदम, श्री. मौलिक, जितेंद्र तामोरे यांच्यासह स्पोर्टिंग क्लब कमिटीचे पदाधिकारी अध्यक्ष विलास जोशी, सचिव विकास रेपाळे, खजिनदार जितेंद्र मेहता, उपसचिव श्रावण तावडे, उपसचिव सतिश नाचणे, सभासद किरण साळगांवकर, अतुल फणसे, प्रशांत गावंड, मनोज यादव आदी उपस्थित होते.

प्रमुख मान्यवरांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन आणि नाणेफेक करुन स्पर्धेस प्रारंभ झाला. उपस्थित मान्यवरांच्या स्पोर्टिंग क्लब्स कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव दीपक पाटील यांनी स्पोर्टिंग क्लब्स कमिटीच्या निवडून आलेल्या नुतन कार्यकारणीचे अभिनंदन केले. १४ वर्षाखालील निवड चाचणी स्पर्धा ही पूर्वी मुंबईत दोनच ठिकाणी व्हायची. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ‘शताब्दी चषक' क्रिकेट स्पर्धेस मान्यता देऊन ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना एक मोठे व्यासपिठ दिले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठाणे जिल्ह्याकडे कधीच दुर्लक्ष केलेले नाही. मुंबईनंतर आमचे लक्ष्य ठाणे हेच आहे. आज स्पर्धेच्या निमित्ताने सिलेक्टर सुध्दा येथे उपस्थित आहेत. ठाण्याने यापूर्वीही चांगले क्रिकेटर दिले आहेत आणि या पुढेही या स्पर्धांच्या माध्यामातून मिळतील, असा विश्वास दीपक पाटील यांनी व्यक्त केला.

स्पोर्टिंग क्लब्स कमिटीचे सचिव विकास रेपाळे यांनी आपल्या भाषणात शताब्दी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजनाची संधी दिल्याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशने प्रथम आभार मानले. सेंट्रल मैदानाचा कायापालट मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करणार आहोत. ठाण्यातील खेळड़ूंना एक व्यासपिठ उपलब्ध करुन देण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यामातून आमचा प्रयत्न आहे. जास्तीत जास्त स्पर्धा भरवण्यासाठी एमसीएने आम्हाला मान्यता द्यावी, अशी मागणी यावेळी विकास रेपाळे यांनी केली.

प्रतिक्रिया द्या