संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची राबोडी पोलीस ठाण्यावर धडक.

अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यावर धडक दिली.
आमदार संग्राम जगताप यांनी करमाळा येथील जनआक्रोश मोर्चात बोलताना, "दीपावलीची खरेदी फक्त हिंदूंच्या दुकानातून करा", असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. मात्र, अजित पवार यांनी अद्याप त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.
राबोडीतील मुख्य नाक्यावरून या शांततामय मार्गाने या मोर्चाला सुरूवात झाली. संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करा, धार्मिक विद्वेष पसरविणे बंद करा, हिंदू-मुस्लीम, शिख- इसाई; हम सब है भाई-भाई, अशा संदेशाचे फलक हातात घेऊन शेकडो हिंदू, मुस्लीम तरूण-तरूणी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण यांची भेट घेऊन संग्राम जगताप यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 196 , 353(2), 299 नुसार गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीचे निवेदन दिले.
याप्रसंगी मनोज प्रधान यांनी सांगितले की, संग्राम जगताप यांचे विधान फक्त धार्मिक द्वेष पसरविणारे नाही तर अजित पवार यांनाच आव्हान देणारे आहे. एरवी शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या समतावादी विचारांवर बोलणार्या अजित पवार यांच्याच गटाचा एक आमदार सामाजिक संघर्ष निर्माण करीत आहे. याचाच अर्थ जगताप यांना अजित पवार गटाची विचारधारा मान्य नाही. तसेच, अजित पवार हे कारवाई करण्याऐवजी फक्त नोटीस देत असतील तर त्यांची जगतापांना मूक संमती नाही ना, अशी शंका मनात येते. या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही गृहमंत्र्यांकडे मागणी करतो की, संग्राम जगताप यांच्यासारखी माणसे जर मोकळी राहिली तर महाराष्ट्रात दंगली माजतील. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक करावी.
या आंदोलनात कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, मोझम खान, युवा कार्याध्यक्ष राजेश सु. कदम, विद्यार्थी अध्यक्ष राहु पु. पाटील , सरचिटणीस राजेश जगन्नाथ साटम , राजू चापले , जतीन कोठारे, मकसूद खान जयेश पाटील , राहुल पाटील ,शिवा काळू सिंह, धर्मेंद्र अस्थाना, कैलास सुरकर ,प्रवीण सिंग, हिरामण गंगावसे, हरिचंद्र पंडित,अविनाश खंदारे, साईडे इक्बाल शेख, महेंद्र पवार, दिगंबर गरुड , कृणाल वाघ, नईम खान आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या


.jpeg?token=eyJraWQiOiJzdG9yYWdlLXVybC1zaWduaW5nLWtleV80OWRlYzg4MC1hYjhhLTQyMmEtYWNlZS1lMmNhMjhlMGM0MTciLCJhbGciOiJIUzI1NiJ9.eyJ1cmwiOiJpbWFnZXMvSU1HXzkzOTUgKDEpLmpwZWciLCJpYXQiOjE3NjEzMTg2NDQsImV4cCI6MTc5Mjg1NDY0NH0.osE1X3LOPOP5TJfidIN4q64ugi3DkFDipbuqPE3M6qY)
