सरन्यायाधीश गवईंच्या हल्ल्याच्या निषेधार्थ ; मराठी एकीकरण समितीकडून पोलीसांना निवेदन.

स्वाभिमानावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर आघात ; गोवर्धन देशमुख
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका माथेफिरू वकिलाने सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरुममध्ये पायातील जोडा फेकण्याचा अतिशय गंभीर प्रयत्न केला. या घटनेनंतर देशभरातून तीव्र निषेधाची लाट पसरली असून, संबंधित या वकिलाविरुद्ध योग्यती कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही गंभीर घटना घडली त्या दिवशी, दिल्लीतील वकील राकेशकिशोर तिवारी यांनी कोर्ट नंबर 1 मध्ये सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आपले जोडे काढून सरन्यायाधीशांवर भिरकावण्याचा प्रयत्न केला.
यादरम्यान भारतीय न्याय व्यवस्थांच्या स्वाभिमानावर आघात आहे. अशा दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दहिसर पोलीस ठाणे येथे निवेदन सादर करून मागणी करण्यात आली. याप्रसंगी मराठी एकीकरण समिती चे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, सचिव कृष्णा जाधव, उपाध्यक्ष महेश पवार, प्रमोद पार्टे, उत्तर मुंबई अध्यक्ष हितेश साळवी, मोहन भोईर, योगेश देशमुख, रोनीत भोईर, राजेश दहिवालकर आदीं उपस्थित होते.
‘सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राचे सुपुत्र असून महाराष्ट्राचा अभिमान, मराठी माणसाचे मानबिंदू असून अशा व्यक्तीचा अपमान मराठी माणूस मुळीच सहन करणार नाही.असा निंदनीय प्रकार म्हणजे महाराष्ट्रातील मराठी बांधवांचा अपमान आहे त्यामुळे आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो,
देशाच्या लोकशाहीवर घाला आहे, आज सरन्यायाधीशवर हल्ला होतोय, उद्या सामान्य नागरिकांना तर बोलूच देणार नाहीत,म्हणून अशा लोकांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत,देशाच्या सर्वोच्च पदी एक मराठी माणूस विराजमान झाला आहे त्यामुळे या हल्ला करण्याच्या घटनेचा निषेध राज्यभर झाला पाहिजे असे मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले.
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या


.jpeg?token=eyJraWQiOiJzdG9yYWdlLXVybC1zaWduaW5nLWtleV80OWRlYzg4MC1hYjhhLTQyMmEtYWNlZS1lMmNhMjhlMGM0MTciLCJhbGciOiJIUzI1NiJ9.eyJ1cmwiOiJpbWFnZXMvSU1HXzkzOTUgKDEpLmpwZWciLCJpYXQiOjE3NjEzMTg2NDQsImV4cCI6MTc5Mjg1NDY0NH0.osE1X3LOPOP5TJfidIN4q64ugi3DkFDipbuqPE3M6qY)
