ठाणे पोस्टल विभागाच्या वतीने आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने “स्वच्छोत्सव” अभियानांतर्गत “स्वच्छता रॅली” चे आयोजन

देशभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा कालावधी १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आहे. या रॅलीचे उद्दिष्ट सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, पर्यावरण जनजागृती व स्वच्छ हरित उत्सव यांचा प्रचार-प्रसार करणे आहे.
ठाणे पोस्टल विभागाच्या वतीने आणि ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने “स्वच्छोत्सव” अभियानांतर्गत “स्वच्छता रॅली” चे आयोजन दिनांक २४.०९.२०२५ रोजी ठाण्यात करण्यात आले. ही रॅली “स्वच्छता ही सेवा” २०२५ या अभियानाचा एक भाग असून,
ही रॅली २४.०९.२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता मासुंदा तलाव, ठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झाली. या रॅलीत ठाणे पोस्टल विभाग व ठाणे महानगरपालिका यांचे सुमारे २०० स्वयंसेवक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. इचके अभिजीत दिलीपराव, संचालक, टपाल सेवा, नवी मुंबई पोस्टल क्षेत्र उपस्थित होते. तसेच श्री. प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महानगरपालिका हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री. के. नरेंदर बाबू, वरिष्ठ अधीक्षक, टपाल कार्यालय, ठाणे विभाग आणि ठाणे पोस्टल टीमने हा कार्यक्रम अत्यंत उत्तम रीतीने पार पाडला.
डॉ. इचके अभिजीत दिलीपराव यांनी नवरात्र उत्सवाच्या शुभप्रसंगी “स्वच्छोत्सव” ही २०२५ सालची थीम हि सणाच्या उत्साही वातावरणाशी सुसंगत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. उपस्थित अधिकाऱ्यांनी परिसर व कार्यस्थळ स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. मान्यवरांनी “Reduce, Recycle and Reuse” या तत्त्वावर भर दिला व “नो प्लास्टिक, नो पॉलिथीन” या मोहिमेला यशस्वी करण्याचे आवाहन केले. प्लास्टिक व सिंगल-यूज प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम यासंबंधी जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या प्रसंगी श्री. प्रशांत रोडे, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महानगरपालिका, यांनी सर्व नागरिकांना घरगुती कचरा ओला व सुका या प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्याचे आवाहन केले, जेणेकरून कचऱ्यावरील पुढील प्रक्रिया सुलभ होईल.
रॅलीनंतर मासुंदा तलावासमोरील बाजारातील हातगाडी विक्रेत्यांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आले, जेणेकरून सिंगल-यूज प्लास्टिकचा वापर कमी होईल व पर्यावरणास अनुकूल पर्यायांना प्रोत्साहन मिळेल.कार्यक्रमाचा समारोप ठाणे महानगरपालिकेच्या मार्केटमधील सर्व विक्रेते व नागरिक यांच्यासाठी सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृती कार्यक्रमाने करण्यात आला. नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकमुक्तीच्या दिशेने टपाल विभागाच्या या प्रयत्नांचे अभिनंदन केले.
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या



