मनसेच्या रक्तदान महाकुंभाला ठाणेकरांचा प्रतिसाद, तब्बल ४६५ बाटल्या रक्त संकलन.

ठाणे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये फक्त पाच दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. ही गंभीर बाब कळताच ठाण्यातील ह्या रक्ताच्या तुटवड्यावर इलाज करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तदानाचा महाकुंभ मेळा भरवला.
ठाणे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये फक्त पाच दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. ही गंभीर बाब कळताच ठाण्यातील ह्या रक्ताच्या तुटवड्यावर इलाज करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तदानाचा महाकुंभ मेळा भरवला. या शिबिरामध्ये तब्बल ४६५ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. मनसे, ठाणे महापालिकेचे कळवा रुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना लागणार्या रक्ताचा तुटवडा भासू लागला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडत होता. दरम्यान, मुबलक रक्तसाठा उपलब्ध न झाल्याने रुग्णांना लागणाऱ्या रक्तासाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागली. याबाबतची माहिती कळताच मनसे नेते अविनाश जाधव यांनी तातडीने रक्तदान शिबीराचे आयोजन करत जवळपास ४६५ बाटल्याचे संकलन केले. या शिबिराला महाराष्ट्र सैनिकांनी तसेच,महाविद्यालयीन तरुण- तरूणी आणि रक्तदात्यांनी जोरदार प्रतिसाद दिला.
*प्रतिक्रिया : -*
ठाण्यात रक्ताचा पुरवठा कमी झाल्याची बाब कळताच तातडीने पुढाकार घेऊन रक्तदानाचा महाकुंभ आयोजित करण्याचे ठरवले. त्यानंतर, पक्षाचे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या निर्देशानुसार सर्व कार्यकर्ते कामाला लागले. ठाणेकर युवक आणि नागरिकांनी देखील या मोहिमेला पाठींबा दर्शवित मोठ्या संख्येने रक्तदान केले. विशेष म्हणजे सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र येत पुढील एक वर्ष पुरेल इतका रक्तसाठा जमा करण्यासाठी सामुहिक योगदान दिले.
- *अविनाश जाधव, मनसे जिल्हाध्यक्ष*
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या



