खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन.

राहुल गांधींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा - खासदार नरेश म्हस्के* *ठाण्यातील मेंटल हॉस्पिलमध्ये राहुल गांधी यांच्यावर उपचारासाठी बेड बुक !*
राहुल गांधी हायहाय, या पप्पूचे कारायचे काय ? - खाली डोके वर पाय, राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणांनी आज टेंभी नाका दुमदुमला. दिल्ली येथे सुरु असलेल्या एआय समिट दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले चड्डी बनियान आंदोलन, राहूल गांधी वारंवार करत असलेली देशविरोधी विधाने, संसदेचे कामकाज चालू न देणे, देशाच्या प्रगतीच्या आड येणे या सर्व गोष्टींचा निषेध आज टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करुन केला.
या आंदोलनावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या समवेत शिवसेनेचे सचिव व नगरसेवक राम रेपाळे, शहर प्रमुख हेमंत पवार, युवा सेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे, नगरसेवक सुधीर कोकाटे, प्रकाश पायरे, कमलेश चव्हाण, प्रशांत पाटील, रमाकांत पाटील, अमित जयस्वाल, दिपक म्हस्के, दिनेश मलपे, राजेश तावडे, संतोष बोडके, दत्ता फासले, वंदना डोंगरे, पूजा लोंढे तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवासैनिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला भारत देश आज प्रगतीच्या वाटेवर आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांत आपण उल्लेखनीय प्रगती केली आहे. संपूर्ण जग आज भारताकडे एक प्रेरणा म्हणून बघत आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम आणि प्रकल्प देशभर राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काल दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या एआय समिटमध्ये तब्बल १८० देशांतील प्रतिनिधी, जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि उद्योगविश्वातील मान्यवर उपस्थित होते. याठिकाणी भारताच्या तांत्रिक प्रगतीचं दर्शन घडत असताना, काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शर्ट काढून भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात निदर्शने केली, तसेच पंतप्रधानांच्या विरोधात घोषणाबाजी करत काही काळ तणावाचं वातावरण निर्माण केलं. देशाच्या सन्मानाला आणि अशा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांच्या गांभीर्याला धक्का पोहोचवणारी ही कृती निश्चितच खेदजनक असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
राहुल गांधी नेहमीच देशाच्या प्रगतीविरोधात सातत्याने देशांतर्गत आणि परदेशी मंचांवर वक्तव्य करत असतात. पण अशा मोठ्या आणि प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आणून चुकीची कृत्य करायला लावणं अजिबात योग्य ठरत नाही. राष्ट्रहित, कार्यक्रमाचं गांभीर्य आणि जागतिक स्तरावरील भारताची प्रतिमा यांचा विचार करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणून पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि देशाच्या विरोधात करण्यात आलेल्या त्या निदर्शनांचा आज आम्ही ठाम निषेध केला. मतभेद असू शकतात, पण देशाच्या सन्मानापेक्षा कोणतीही भूमिका मोठी असू शकत नाही असे खासदार नरेश म्हस्क म्हणाले.
आज राहुल गांधी भिवंडीत आले होते. त्यांनी त्यांचा गाड्यांचा ताफा ठाण्याकडे वळवावा. त्यांची आज मानसिक स्थिती बिघडलेली आहे. संसदेत सभागृहात ते तशाच पध्दतीने वागत असतात. शिंदे साहेबांच्या आदेशावरुन ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटल मध्ये त्यांच्यासाठी बेड बुक केले असुन त्यांच्यावर चांगले उपचार करण्यात येतील, असा मिश्किल टोलाही खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला.
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या



