ब्रेकिंग न्यूज
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रशासनास निर्देश खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन. शहापूरसाठी नव्या पाणीपुरवठा योजनेला तातडीची मंजुरी द्यावी – आ. ॲड. निरंजन डावखरे यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन*लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती.. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन..यशस्वीनगरचा आदर्श पुनर्विकास;११० कुटुंबांना मिळाली दर्जेदार घरे.. प्रजासत्ताक दिनी झालेली कारवाई चुकीची; वनमंत्री गणेश नाईक यांनी मागितली जाहीर माफी..

ठाणे शहर जिल्हा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन..

२७ जानेवारी, २०२६ रोजी ०५:३४ PM2 मिनिटेप्रतिनिधी - नम्रता सुर्यवंशी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन..
शेअर करा:

गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत दिघे साहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.

टेंभी नाका येथील दिघे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी दिलेल्या “अमर रहे, अमर रहे... दिघे साहेब अमर रहे” या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण टेंभी नाका परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर 'शक्तीस्थळ' येथे शिवसैनिकांनी दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.

याप्रसंगी शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, प्रदीप शिंदे, शहरप्रमुख अनिष गाढवे, उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, नवनिर्वाचित ठामपा नगरसेवक शहाजी खुस्पे, वसंत गवाळे, संजय तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, चंद्रकांत विधाटे, विभाग प्रमुख जिवाजी कदम, प्रतिक राणे, मयूर पैलकर, राजू मोरे, महेंद्र पाटील, राजू शिरोडकर, विनोद यादव, हेमंत व्यापारी, अमोल हिंगे, शशिकांत कालगुडे, महेश कदम, दत्ता सावंत वरून मानकामे सुशांत घोलप, हे उपस्थित होते.

महिला आघाडीच्या वतीने माजी नगरसेविका नंदिनी विचारे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, महिला उपजिल्हा संघटिका आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, प्रमिला भांगे, मंजिरी ढमाले, वैशाली शिंदे, संपदा उरणकर, कविता नार्वेकर, राजेश्री नवीन सुर्वे, ऋतुजा शिंत्रे, वनिता कोळी, सुषमा याग्निक, सविता कांबळे, सुवर्णा साळुंखे, प्राची चव्हाण, सायली गुंजाळ, यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिघे साहेबांनी आयुष्यभर जपलेली जनसेवेची परंपरा आणि संघटनाप्रती असलेली निष्ठा यापुढेही कायम राखण्याचा निर्धार यावेळी सर्व शिवसैनिकांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या