सीसीटीव्हीचा मागोवा घेत ठाणे गुन्हे शाखा घटक १ च्या पथकाने सराईत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या.

ठाण्यातील राबोडी येथील बाटा कंपाऊंड परिसरातील श्री. सिध्दनाथ मार्केटिंग सिगारेट डिस्ट्रिब्युटरचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी तब्बल लाखांचा मुद्देमाल लांबवला होता. या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास केला.
ठाण्यातील राबोडी येथील बाटा कंपाऊंड परिसरातील श्री. सिध्दनाथ मार्केटिंग सिगारेट डिस्ट्रिब्युटरचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी तब्बल लाखांचा मुद्देमाल लांबवला होता. या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हे शाखा घटक 1च्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. कोणतेही धागेदोरी नसल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेतला. या चोरट्यांची दुचाकी आणि टेम्पोचा मागोवा घेत घटक 1 च्या पथकाने तिघांच्या मुसक्या आवळल्या. या चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी 7 गुन्ह्यांची कबुली दिली. हे चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यापैकी महेंद्रकुमारवर 14 तर राजेश कदमवर 24 गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 10 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महेंद्रकुमार मेघवाल (२८) व गणेश पाटीदार (४७) अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे दोघेही मूळचे राजस्थानी आहेत. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा आणखी एक साथीदार राजेश उर्फ अण्णा कदम (४७) याला देखील अटक केली आहे. पोलीस त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.

