ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र

गेटवे ऑफ इंडिया’ ते ‘गेटवे ऑफ वर्ल्ड’ ‘इंडिया मेरीटाइम वीक 2025’च्या उद्घाटनात अमित शाहांचे वक्तव्य.

२७ ऑक्टोबर, २०२५ रोजी ०६:२९ PM2 मिनिटेप्रतिनिधी-: नम्रता सूर्यवंशी
गेटवे ऑफ इंडिया’ ते ‘गेटवे ऑफ वर्ल्ड’ ‘इंडिया मेरीटाइम वीक 2025’च्या उद्घाटनात अमित शाहांचे वक्तव्य.
शेअर करा:

इंडिया मेरिटाइम वीक - २०२५ मधून तब्बल १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होणार, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या शुभहस्ते उद्घाटन.

भारताचा समुद्री इतिहास 5,000 वर्षांचा आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश नव्याने समुद्री इतिहास लहिण्यास सज्ज झाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी केले. सोमवारी ‘इंडिया मेरीटाइम वीक 2025’ चे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते पार पडले. त्या प्रसंग ते मार्गदर्शन करताना बोलत होते.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

या वेळी शाह म्हणाले, “गेटवे ऑफ इंडिया येथे हे सम्मेलन आयोजित केलं जात आहे. या मंथनातून जे विचार समोर येतील, त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया ‘गेटवे ऑफ वर्ल्ड’ मध्ये परिवर्तित होईल.” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमित शाह म्हणाले, “गेल्या दहा वर्षांत मेरीटाइम इकॉनॉमीमध्ये केलेल्या सुधारणांमुळे भारत जागतिक समुद्री नकाशावर एक उदयोन्मुख शक्ती म्हणून उभा आहे. भारताची समुद्री स्थिती, लोकशाही स्थैर्य आणि नौदलाची क्षमता हिंद-प्रशांत आणि ग्लोबल साउथ प्रदेशात विकास, सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोठं योगदान देत आहेत.”

शाह यांनी सांगितले की, “भारताच्या समुद्री ताकदीच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने देशाची भौगोलिक स्थिती अत्यंत महत्त्वाची आहे. भारताची सागरी किनारपट्टी तब्बल ११ हजार किलोमीटर लांब आहे. देशात १३ सागरी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश आहेत. देशाच्या जीडीपी मध्ये सागरी व्यापाराचा वाटा सुमारे ६० टक्के आहे.

हिंद महासागरातील २८ देश जागतिक निर्यातीत १२ टक्के योगदान देतात. ‘इंडिया मेरीटाइम वीक’च्या माध्यमातून भारत आपली संपूर्ण क्षमता जागतिक गुंतवणूकदारांसमोर मांडत आहे. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रात हे सम्मेलन आता सर्वात प्रतिष्ठित व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. या चौथ्या आवृत्तीतून ‘विकसित भारत’च्या ध्येयाकडे वाटचाल अधिक वेगाने होईल. या माध्यमातून तब्बल १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील,” असे अमित शाहा म्हणाले.

प्रतिक्रिया द्या