ब्रेकिंग न्यूज
ताज्या बातम्या

ठाणेकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा, आता शहरात धावणार मेट्रो!

२१ सप्टेंबर, २०२५ रोजी ०१:०१ PM2 मिनिटेप्रतिनिधी-: नम्रता सूर्यवंशी
ठाणेकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा, आता शहरात धावणार मेट्रो!
शेअर करा:

वडाळा ते कासारवडवली-गायमुख या मेट्रो-४ व ४अ प्रकल्पामुळे होणार गतिमान ठाणे ! मा. प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाना यश !

वडाळा ते कासारवडवली-गायमुख या मेट्रो-४ व ४अ चे काम पुर्ण झाले असून या मार्गाची चाचणी दि. २२ सप्टेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या मार्गावर धावणारी ट्रेन ही ८ डब्ब्यांची असणार आहे. तसेच या मेट्रो मार्गाला एकूण ३२ स्थानके असतील. या मार्गाची एकूण लांबी ३५.२० कि.मी. असून या प्रकल्पासाठी एकूण १५,४९८ कोटी रूपये खर्च आला आहे. या मेट्रोने अंदाजे दैनंदिन १३.४३ लक्ष म्हणजेच प्रतिताशी प्रतिदिशा ३३,४१७ प्रवासी प्रवास करू शकतात. या मेट्रो मार्गामुळे नागरिकांच्या प्रवासाच्या वेळेत ५० ते ७५ टक्के बचत होणार आहे. तसेच हा मेट्रो मार्ग गायमुख स्थानक येथे गायमुख ते मीरा-भाइर्दर या मेट्रो-१० ला जोडण्यात येणार असून डोंगरीपाडा स्थानक येथे ठाणे रिंग मेट्रोला जोडण्यात येणार आहे त्याचप्रमाणे कापुरबावडी स्थानक येथे ठाणे ते कल्याण या मेट्रो-५ ला देखील जोडण्यात येणार आहे. हे चारही मेट्रो मार्ग पुर्णत्वास आल्यानंतर भारतातील सर्वात जास्त लांबीचा अंदाजे ५८ कि.मी.चा उन्नत मार्ग होणार असून त्याचा अंदाजे २१.६२ लक्ष प्रवाश्यांना लाभ होणार आहे.

मुंबई शहराच्या वेशीवर असलेले ठाणे शहर तसेच शहरालगत असलेल्या मीरा- भाईंदर शहराचे शहरीकरण झपाट्याने होत असल्याने भविष्यात वाढत्या लोकसंख्येनुसार वाहनाची संख्या वाढल्याने ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडीला तोंड द्यावे लागू शकते तसेच सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेवर वाढणारा ताण हे लक्षात घेऊन यावर उपाय योजना करण्याच्या दृष्टीने स्थानिक आमदार या नात्याने श्री. प्रताप सरनाईक यांनी शहराच्या वेशीवर आलेली मेट्रो कासारवडवली-गायमुख पर्यंत नेण्यात यावी यासाठी तात्कालिन मुख्यमंत्री मा.श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडून मागणी केली होती. त्याचबरोबर याकरीता त्यावेळचे शिवसेना पक्षाचे आमदार व आताचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आंदोलने देखील केली. त्यानंतर सन २०१४ मध्ये मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर तात्कालिन मुख्यमंत्री म्हणून वडाळा ते कासारवडवली-गायमुख असा मेट्रो मार्ग करण्यात यावा जेणेकरून ठाणे शहरातील नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने सोयीस्कर होईल यासाठी वारंवार त्यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. या दरम्यान नागपूरसह, पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबईत मेट्रोला मंजूरी मिळून काम देखील सुरू झाले होते त्यामुळे ठाणे शहरात देखील मेट्रो सुरू व्हावी यासाठी स्थानिक आमदार या नात्याने श्री. प्रताप सरनाईक यांनी तात्कालिन मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांना एका कार्यक्रमात मेट्रो कंदिलाची प्रतिकृती भेट देऊन तसेच अधिवेशन काळात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाच्या माध्यमातून ’मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर तुपाशी ठाणे का उपाशी?“ या घोषणेचे बॅनर झळकवून ठाणे शहरात मेट्रो सुरू करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधले होते. अखेर शासनातर्फे एम.एम.आर.डी.ए.च्या माध्यमातून वडाळा ते कासारवडवली-गायमुख या मेट्रो-४ व ४अ च्या प्रकल्पाला मंजूरी देण्यात आली व कामाला देखील सुरूवात करून डिसेबंर २०२५ पर्यंत या विहीत दिलेल्या वेळेत प्रकल्प पुर्ण करण्याचे आदेश दिले होते.

वडाळा ते कासारवडवली-गायमुख या मेट्रो-४ व ४अ या मार्गामुळे स्थानिक नागरिकांच्या प्रवास व्यवस्थेत सुधारणा होऊन त्यांचे आर्थिक राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे. तसेच या मेट्रो-मार्गामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे स्थानिक आमदार मा. श्री. प्रताप सरनाईक यांचे स्वप्न साकार होत असून त्यांनी केलेल्या १५ वर्षांपासूनच्या अथक प्रयत्नाना यश आले आहे. त्यामुळे त्यांनी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणविस, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, श्री. अजितदादा पवार यांचे मनपुर्वक आभार मानले.

प्रतिक्रिया द्या