ब्रेकिंग न्यूज
देयके न मिळाल्याने उदयोन्मुख कंत्राटदार हर्षल पाटील यांने जीवन‌ संपविले. अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये’, महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद. मुंबईत माजी आमदार स्वर्गीय शांतारामभाऊ फिलसे यांच्या जयंती निमित्त कुणबी समाजोन्नती संघ महाड पोलादपूर शाखेचा आर्थिक साक्षरता उपक्रम..ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांवरील विकासकामे तात्काळ पूर्ण करा,  अन्यथा जनआंदोलन - खासदार नरेश म्हस्के सितारे जमीन पर' सिनेमाच्या स्पेशल शोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती. शिष्यवृत्ती परीक्षेत वरद जाधव जिल्ह्यात प्रथम; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव.

महाराष्ट्र

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे १२ किल्ले.

११ जुलै, २०२५ रोजी ०६:४८ PM2 मिनिटेप्रतिनिधी -: नम्रता सूर्यवंशी
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांचे १२ किल्ले.
शेअर करा:

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद व्यक्त.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठरली आहे. या निर्णयामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार असून, हे राज्यासाठी मोठं यश आहे अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नामांकनासाठी गेल्या वर्षी पाठविण्यात आला होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, आपल्या स्वराज्याचे साक्षीदार असलेले हे किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची जिवंत प्रतीकं आहेत. त्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश होणं, हे महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे.

या ऐतिहासिक निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि भारतीय पुरातत्त्व विभागाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मन:पूर्वक आभार मानले आहेत. मुख्यमंत्री असताना आपण स्वतः या किल्ल्यांच्या नामांकनासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचंही त्यांनी नमूद केलं.

राज्य शासन हे या सर्व गड-किल्ल्यांच्या जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान म्हणून टिकवून ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या ऐतिहासिक घडामोडीबद्दल त्यांनी सर्व शिवप्रेमी आणि महाराष्ट्रवासीयांचे मन:पूर्वक अभिनंदन केलं आहे.

प्रतिक्रिया द्या