“सितारे जमीन पर” या चित्रपटाचे विशेष मुलांसाठी मोफत स्क्रीनिंग.

समाजसेविका रीना मुदलियार यांच्या माध्यमातून ठाण्यातील इंटरनिटी मॉल मूविमॅक्स थिटरमध्ये “सितारे जमीन पर“ या चित्रपटाचे मोफत स्क्रिनिंग विशेष मुलांसाठी आयोजित करण्यात आले होते.
ठाणे -:
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे व मिसेस उपमुख्यमंत्री लता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के व ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटिका मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजसेविका रीना मुदलियार यांच्या माध्यमातून विशेष मुलांसाठी “सितारे जमीन पर “ या चित्रपटाचे मोफत स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. मिसेस उपमुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे यांचा येत्या ११ जुलैला वाढदिवस आहे या वाढदिवसाचे औचित्य साधून रीना मुदलियार यांनी चित्रपटाचे मोफत स्क्रिनिंग आयोजित करत अनोखी अशी भेट दिली आहे. ठाण्यातील इटरनिटी मॉल मूविमॅक्स थिटरमध्ये हा चित्रपट आयोजित करण्यात आला होता. अभिनेता आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा सध्या खूप गाजत आहे. विशेष मुलांवर आधारित हा सिनेमा आहे. याच निमित्त जिद्द शाळेतील विशेष मुलांसाठी हा चित्रपट आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने विशेष मुल व पालक उपस्थित होते. या सर्व मुलांनी पालकांसोबत सिनेमाचा आनंद लुटला. यावेळी जिद्द शाळेच्या प्राध्यापिका अर्चना मॅडम, कोपरी पाचपाखाडी समन्वयक यमुना म्हात्रे, उपसमन्वयक आनंदी खांबल, विभाग प्रमुख मनीषा शिंदे, शाखाप्रमुख निलम रामाणे उपस्थित होते. याप्रसंगी सर्व विशेष मुलांना गुलाबाचे फुल देवून खाऊ वाटप करण्यात आले. तसेच जिद्द शाळेच्या प्राध्यापिका अर्चना मॅडम यांचा समाजसेविका रीना मुदलियार यांनी सन्मान केला. तर अर्चना मॅडम यांनी रीना मुदलियार यांचे विशेष कौतुक करत आभार मानले.
प्रतिक्रिया द्या
संबंधित बातम्या
