ब्रेकिंग न्यूज
वर्तकनगर पोलिस विभागाची उल्लेखनीय कामगीरी, गहाळ झालेले मोबाईल फोन नागरिकांना केले सुपूर्द. येऊरमध्ये बांधकाम साहित्याच्या गाड्या परवानगीशिवाय नेण्यावर निर्बंधअनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा, महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. देयके न मिळाल्याने उदयोन्मुख कंत्राटदार हर्षल पाटील यांने जीवन‌ संपविले. अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये’, महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद. मुंबईत माजी आमदार स्वर्गीय शांतारामभाऊ फिलसे यांच्या जयंती निमित्त कुणबी समाजोन्नती संघ महाड पोलादपूर शाखेचा आर्थिक साक्षरता उपक्रम..

क्रीडा

प्रो गोविंदा सीझन ३ पूर्व पात्रता फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद.

३० जून, २०२५ रोजी ११:२० AM2 मिनिटेप्रतिनिधी - नम्रता सूर्यवंशी
प्रो गोविंदा सीझन ३ पूर्व पात्रता फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद.
शेअर करा:

१६ संघ अंतिम फेरीत दाखल , अंतिम सामना ७, ८, ९ ऑगस्ट रोजी रंगणा

ठाणे, २९ जून : ठाण्यातील स्व. बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर येथे झालेल्या प्रो गोविंदा सीझन ३ च्या पूर्व पात्रता फेरीत राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण ३२ संघांनी आपल्या दमदार खेळकौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पुर्वेश सरनाईक, मुंबई टी २० लीगचे अध्यक्ष श्री. विहंग सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, डॉ. कश्मिरा सरनाईक आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

आपल्या मातीतला खेळाला प्रो गोविंदाच्या माध्यमातून व्यावसायिक आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले. आपल्यातील अंगभूत कौशल्य आणि अचूक टायमिंग साधून या स्पर्धेत स्वतःची जागा मिळवणाऱ्या सर्वच गोविंदांचे मनापासून कौतुक आहे. गोविंदा या उत्सवाला प्रो गोविंदाद्वारे खेळाचा दर्जा प्राप्त झाला. याचा अत्यंत अभिमान आहे, असे श्री. प्रताप सरनाईक म्हणाले.

या पात्रता फेरीत मानवी मनोऱ्यांचे शौर्यपूर्ण सादरीकरण पाहायला मिळाले. गोविंदा या पारंपरिक खेळाला व्यावसायिक दर्जा मिळावा आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळावी, हाच या स्पर्धेचा उद्देश असल्याचे प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले. हा प्रो गोविंदा सीझन ३ यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व परीक्षकांचे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार.

येत्या ७, ८, ९ ऑगस्ट २०२५ ला एस.स्व्हि.पी स्टेटियम, डोम, वरळी येथे अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ संघांचे अजून अधिक दर्जेदार आणि थरारक सादरीकरण पाहता येणार आहे. दहीहंडी हा केवळ उत्सव नाही, तर कबड्डी आणि क्रिकेटप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. या माध्यमातून गोविंदा पथकांना आर्थिक संधी, सुरक्षितता, तसेच मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची दाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

पूर्व पात्रता फेरीतून अंतिम फेरीत पात्र ठरलेली संघांची नावे रँकनुसार पुढील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

१. आर्यन्स गोविंदा पथक

२. यश गोविंदा पथक

३. शिवसाई क्रीडा मंडळ

४. शिवगणेश मित्र मंडळ

५. अष्टविनायक गोविंदा पथक

६. ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक

७. अखिल मालपा डोंगरी

१,२,३ मित्र मंडळ गोविंदा पथक

८. श्रीराम गोविंदा पथक

९. हिंदुराज गोविंदा पथक, दापोली

१०. संतनगर गोविंदा पथक

११. शिवनेरी गोविंदा पथक

१२. शानदार गोविंदा पथक

१३. शिवटेकडी गोविंदा पथक

१४. विघ्नहर्ता गोविंदा पथक

१५. बाल उत्साही गोविंदा पथक

१६. संभाजी क्रीडा मंडळ

या उपक्रमाच्या माध्यमातून प्रो गोविंदा लीगद्वारे गोविंदा खेळाला आधुनिक, व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचे पाऊल यशस्वीपणे उचलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

संबंधित बातम्या

ठाणेकर जलतरणपटूंचा इंग्लंडमध्ये डंका.
१ जुलै, २०२५ रोजी ०७:३१ PM2 मिनिटे
IPL च्या ट्रॉफीवर RCB ने कोरलं नाव!
३ जून, २०२५ रोजी ०६:१३ PM1 मिनिटे