ब्रेकिंग न्यूज
विरार पूर्व इमारत दुर्घटनेत घरे गमावलेल्या नागरिकांना म्हाडाची ६० घरे तात्पुरत्या स्वरूपात मिळणार !ठाणे महापालिका क्षेत्रात दीड दिवसांच्या १९५६७ गणेश मूर्तींचे विसर्जन. आझाद मैदानावर २९ ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी आंदोलन; न्यायालयाने अटींसह दिली परवानगी. श्रीगणेशाची कृपादृष्टी सगळ्यांवर राहो..! एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार गणेशोत्सवापूर्वी होणार..! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. कल्याण डोंबिवलीत मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर नगरसेवकांनी दाखवला विश्वास. ठाण्यात ' मत चोरी ' विरोधात काँग्रेसचा मशाल मोर्चा.

ठाणे शहर जिल्हा

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, ठाणे शहरात काही दिवस अनियमित पाणीपुरवठा.

२० ऑगस्ट, २०२५ रोजी ०६:५२ PM1 मिनिटेप्रतिनिधी -: नम्रता सूर्यवंशी
ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, ठाणे शहरात काही दिवस अनियमित पाणीपुरवठा.
शेअर करा:

पंंपिंग स्टेशनमध्ये येत असलेल्या गाळामुळे पंपिंग क्षमतेवर झाला परिणाम, पाणी गाळून पिण्याचे आवाहन.

सलग तीन दिवस भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा, व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. नदीपात्रात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने पिसे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे या पंपिंग स्टेशनवर पूर्ण क्षमतेने पंपिंग होण्यात अडथळे येत आहेत. तसेच, पाण्याच्या गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. या सर्व परिस्थितीमुळे ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा सुमारे २५ टक्के कमी झाला आहे.

पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे शहरामध्ये पुढील काही दिवस अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच, या काळात पाणी उकळून प्यावे आणि पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

प्रतिक्रिया द्या